विश्वजीत गायकवाड फाऊंडेशन मार्फत तरुणाच्या आरोग्य आणि विचार संवर्धनाचा संकल्प ऐतिहासिक आणि स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शक पुस्तकासह व्यायाम साहत्याचे वाटप

विश्वजीत गायकवाड फाऊंडेशन मार्फत तरुणाच्या आरोग्य आणि विचार संवर्धनाचा संकल्प 

ऐतिहासिक आणि स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शक पुस्तकासह व्यायाम साहत्याचे वाटप



उदगीर :  इंजिनियर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत तरुणाच्या आरोग्य आणि विचार संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे . याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील  तरुणांसाठी वैचारिक साहित्याचा अभाव आणि व्यायामासाठी आवश्यक साधनांची कमतरता पाहून इंजिनियर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत या ग्रामीण भागातील तरुणांसाठी पुस्तक आणि व्यायामाचे साहित्य वाटप करण्याचा शुभारंभ अवलकोंडा येथे करून    करण्यात आला . 

 ग्रामीण भागातील तरुणांना ऐतिहासिक पुरुषांचे चरित्र माहित व्हावे वैचारिक प्रगल्भता लाभावी यासाठी फाउंडेशन मार्फत धनंजय कीर लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर  यासह फकीरा , क्रांतीसूर्य  महात्मा बसवेश्वर , महात्मा ज्योतिबा फुले ,श्रीमान योगी ,लोकराजा  शाहू छत्रपती ,राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु राजर्षी शाहू महाराज यासह पोलीस भरती , ग्राम सेवक , तलाठी , बँक आदी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक पुस्तक देण्यात येत आहेत . 

तरुणांनी आपले ज्ञान वाढवावे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आरोग्य चांगले राहावे यासाठी व्यायाम करावा . या  ऐतिहासिक ग्रंथामुळे तरुणांना जीवन कसे जगले पाहिजे याबाबत ऐतिहासिक थोर पुरुषांचे चारित्र्य वाचून समजेल आणि व्यायाम साहित्य मदतीमुळे आरोग्य चांगले ठेवून स्पर्धा परीक्षेसाठी पूर्ण तयारी करता यावी यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना ग्रंथ आणि व्यायाम साहित्य देण्यात येत असल्याचे इन्जि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशन चे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी सांगितले . 

   यावेळी अवलकोंडा येथील तरुण आणि नागरिक उपस्थित होते .