उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन

उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन



उदगीर : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात उदगीर शहरातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला परंपरेनुसार सातव्या दिवशी भक्तिभावाने निरोप दिला. 







शहरातील मानाचा गणपती असलेल्या आजोबा गणपतीची राज्याचे आजोबा गणपतीच्या मूर्तीचे पूजन राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न होवून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, उदयगिरी गणेश महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, मनोज पुदाले, सुभाष धनुरे, उत्तरा कलबुर्गे, चंदन पाटील नागराळकर, विजय निटूरे, चेतन वैजापूरे, अमोल निडवदे, महेश झुंगास्वामी, दिलीप मजगे, सुरेश कुरूपखेळगे, भारत करेप्पा, डॉ. रवी मुळे, बबलू मुळे आदी उपस्थित होते.

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांचा उत्साह वाढविला.

शहरातील चौबारा येथे आजोबा गणपतीचे आगमन झल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.

शहरातील मुक्कावार चौकात उदयगिरी सार्वजनिक गणेश महामंडळ व उदगीर नगर परिषदेच्या वतीने विसर्जनातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. या मंचावर ना. संजय बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदयगिरी गणेश महामंडळाचे अध्यक्ष राजेश्वर निटूरे, कार्याध्यक्ष अँड. गुलाब पटवारी, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नायब तहसीलदार राजश्री भोसले, अतिरिक्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण डोईजोडे, उदयगिरी सार्वजनिक गणेश महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संग्रामप्पा हुडगे, अँड. विरप्पा औरादे, सय्यद जानी, मीनाक्षी पाटील, बबिता पांढरे, मंदाकिनी जीवणे, राजकुमार बिरादार, काजल मिरजगावे, वैशाली कांबळे, वर्षा कांबळे, सुनीता तेलंगे, राजकुमार चव्हाण सह इतर मान्यवर उपस्थित होते.

चौबारा, कार्नर चौक, पत्तेवार चौक, मुक्कावार चौक, हनुमान कट्टा मार्गे तळवेस येथे श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनात तरुणाई डीजे व ढोलताशांच्या तालावर थिरकत होती. अनेक गणेश मंडळांनी लक्षवेधी देखावे सादर करून गणेशभक्तांची मने जिंकली.

मानाचा आजोबा गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर शहरातील जवळपास ४५ गणेश मंडळांनी श्री गणरायांचे विसर्जन केले. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. 

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात गणेश विसर्जन पार पडले.

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या स्वागतासाठी महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्ष, विश्वजित गायकवाड फाउंडेशन, सुधाकर शृंगारे यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.