कोलकाता येथील महिला डॉक्टर वरील अत्याचाराला महिना उलटला अद्याप कार्यवाही नाही : उदगीरच्या डॉक्टरांनी केले आंदोलन

कोलकाता येथील महिला डॉक्टर वरील अत्याचाराला महिना उलटला

अद्याप कार्यवाही नाही : उदगीरच्या डॉक्टरांनी केले आंदोलन



उदगीर : कोलकाता येथील महिला डॉक्टर वर अत्याचार झालेल्या घटनेला 9 सप्टेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला, मात्र अद्यापही कसलीच कार्यवाही झाली नसल्याचा निषेध करीत उदगीर येथील प्रसूती व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.

कोलकत्ता येथील डॉक्टर वर अत्याचार होऊन 9 सप्टेंबर रोजी एक महिना पूर्ण होऊनही कुठलीच कार्यवाही किंवा आरोपी अटक झाला नसल्याने डॉक्टरांचे खाच्चिकरण होत आहे. डॉक्टर वरील वाढत असलेल्या हल्ल्याचा निषेध करत प्रस्तुती व स्त्री रोग सोसायटी वतीने शहरातील डॉक्टरांनी उपजिल्हाधिकारी याना निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला न्याय द्या म्हणत डॉक्टरांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या यावेळी शहरातील डॉक्टर्स(UOGS) , इण्डियन मेडिकल एसोसिएशन , इमा उदगीर शाखा , असोसिएशन ऑफ़ मेडिकल कंसल्टैंट्स ,(AMC) उदगीर नर्सिंग असोसिएशन यांचा सहभाग होता. या आंदोलनात डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. सविता पदातूरे, डॉ.प्राजक्ता गुरुडे, डॉ. शैलेश येरोळकर, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. योगीराज चिद्रे, डॉ. अचोले, डॉ. राठोड, डॉ.भोंसले, डॉ. पंकजे मुंडे, डॉ.संतोष पांचाळ, डॉ. महेश जाधव, डॉ.संतोष बिरादार, डॉ. प्रवीण मुंदडा, डॉ.सुप्रिया जगताप, डॉ. मुसरत अत्तार, डॉ मोरे, डॉ. माधुरी शेळके, डॉ. राहुल पाटील, डॉ. कोडगिरे, डॉ नाज़ फ़राह, सौ स्वाती चुलबुलकर, महानंदा सोनटक्के आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.