*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*

 *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण*

*क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*

*विविध मान्यवर राहणार उपस्थित*




*उदगीर*  : उदगीर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्ध विहार व अन्य विकास कामांचा लोकार्पण सोहळा महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी दि.४ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचे लाभवाटप कार्यक्रम होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार संवाद बैठकीत दिली.


या दौरा संबंधी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ११:१५ महामहिम राष्ट्रपती महोदयांचे उदगीर येथे हेलीकाॅप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११:२५ वाजता राष्ट्रपती यांचे बुध्द विहाराकडे आगमन होईल त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अखिल भारतीय भिक्कु संघाचे अध्यक्ष भदंत डाॅ.उपगुप्त महाथेरो यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे यावेळी क्रीडामंत्री बनसोडे यांनी पत्रकार संवाद बैठकीत दिली.

यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी उपसभापती रामराव बिरादार,  राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, शिवसेनेचे  अॅड.गुलाबराव पटवारी,  बसवराज पाटील कौळखेडकर, मनोज पुदाले, ऍड. दत्ताजी पाटील, समीर शेख, उत्तरा कलबुर्गे, अॅड.दिपाली औटे, बालाजी भोसले, शिवशंकर धुप्पे, श्याम डावळे, मनोज चिखले, वसंत पाटील,  सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, ब्रम्हाजी केंद्रे, विकास जाधव, अर्जुन आगलावे, नजीर हाशमी आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बुध्द वंदना होणार असुन पूज्य भन्ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत सभा व मार्गदर्शन होणार आहे असेही ना.संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.