शास्री विद्यालयात संमेलन आपल्या दारी उपक्रम. गुडसूरकर यांच्या कथा सादरीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध.

 शास्री विद्यालयात संमेलन आपल्या दारी उपक्रम. 


गुडसूरकर यांच्या कथा सादरीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध. 



उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने संमेलन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत गुरूवारी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांचा कथा कथन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी धर्म्या ही कथा सादर करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ही मंत्रमुग्ध केले. 
येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९५ वे संमेलन: ९५ कथाकथन या उपक्रमातून संमेलन गावपातळीवर पोहोचविण्याचा मानस आयोजक संस्थेचा असून या उपक्रमांतर्गत गुरूवारी शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात संमेलन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड होते. तर व्यासपीठावर धनंजय गुडसूरकर, रसूल पठाण, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, पर्यवेक्षक बलभीम  नळगीरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक रसूल पठाण यांनी केले. आभार निता मोरे यांनी मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी ,जि.प.प्रा.शा.तोंडार व नेहरु मेमोरिअल विद्यालय येथे गुंडप्पा पटणे यांचे कथाकथन झाले.प्रा.डॉ .स्मिता लखोटीया,केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे,तृप्ती मुंदडा हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी बालमेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी केले.राजर्षी शाहू विद्यालयात रमाकांत बनशेळकीकर यांचे कथाकथन झाले.सुवर्णमाता देशमुख कन्या विद्यालयात दीपक बलसूरकर यांचे कथाकथन झाले.'संमेलन आपल्या दारी'या उपक्रमात कथाकथनाचे उपक्रम चालू आहेत.