ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हेच मराठीचे वैभव : ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर

 ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हेच मराठीचे वैभव : ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर 

उदगीर: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना अनेक भाषा अवगत असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी मराठी भाषेचा विचार केला हेच मराठी भाषेचे मोठे वैभव आहे, असे गौरवोद्गार ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी काढले.
उदगीर येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सभामंडपात
मराठी राजभाषा दिनानिमित्त सोमवारी ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे माझा "मराठाची बोलू कौतुके "या विषयावर व्याख्यान झाले. या प्रसंगी त्यांनी मराठी भाषा देणे,घेणे सुखकर वाटते,हेच मराठी भाषेचे वैभव असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे होते.व्यासपीठावर संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर,रामचंद्र तिरुके,मल्लिकार्जुन मानकरी,सभापती शिवाजीराव मुळे, दिनेश सास्तुरकर,रमेश अंबरखाने,डॉ.रामप्रसाद लखोटीया, गंगाधर दापकेकर डॉ. श्रीकांत मधवरे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले.
पुढे बोलताना ह. भ. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी अध्यात्म्य समाजवादाची परंपरा आहे, हे सामर्थ्य उदगीरच्या विचारवंतातहोते .मराठी भाषा अन विज्ञान मराठीला दीन केले नाही.असे सांगून देगलूरकर महाराजांनी म


राठी भाषेची शुद्धता व संस्कारक्षमता जपण्याचे आवाहन केले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मतदारसंघातील जनतेचा भौतिक विकासाबरोबरच बौद्धिक विकास होण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे म्हणाले. कार्याध्यक्ष नागराळकर यांनी देशाच्या विकासासाठी अध्यात्म साहित्य व विज्ञान यांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात प्रतीक्षा लोहकरे या बाल साहित्यिकेचा राज्यमंत्री बनसोडे व देगलूरकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ.बी. आर. दहिफळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.एस. जी. अन्सारी यांनी केले.