*विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगिरच्या कार्यालय चे उद्घाटन* विविध समित्या निवडीबद्दल चर्चा

 *विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगिरच्या कार्यालय चे उद्घाटन* 

विविध समित्या निवडीबद्दल चर्चा


उदगीर : १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर च्या कार्यालयाचे उद्घाटन प्राचार्य विरभद्र घाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे कार्यकारी सचिव यशवंत मकरंद, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य विठ्ठल घुले, स्वागताध्यक्ष डॉ.अंजूम कादरी, उपाध्यक्ष डॉ ‌सुरेश शेळके, सरफराज अहमद, अर्जुन बागुल,अमिन शेख उपस्थित होते.
यावेळी १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची व विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणी ची संयुक्त बैठक आज दि .२७/२/३२ रोजी संस्था च्या जमहुर हायस्कूल उदगिर येथे संपन्न झाली.
या बैठकीत १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर शहराच्या मध्यवर्ती ठिकाण जिल्हा परिषद शाळा
च्या मैदानावर २३एप्रिल व २४एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ.अंजुम कादरी यांनी केली.
सदर मैदानाच्या संदर्भात
मान्यतेची प्रक्रिया पुर्ण झाली.असे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी संमेलनाच्या स्मरणिका समिती,ग्रंथदिंडी समिती,युवा समिती, बालमंच समिती,मूठभर धान्य व एक रुपया विद्रोही साठीसमिती,कवी संमेलन नियोजन समिती,कविता निवड समिती, अशा विविध समितीचे प्राथमिक गठण करण्याविषयी चर्चा झाली.
प्रा.मारोती कसाब, बाबुराव मशाळकर,कॉ.राजीव पाटील, प्राचार्य विरभद्र घाळे, अहमद सरवर ,संदिप पाटील,जुनेद भाई, श्रीनिवास एकुर्केकर, सिध्देश्वर लांडगे,शेख अयाज,हाश्मी मॅडम, एकनाथ कांबळे, गोलंदाज वाजीदखान, गायकवाड, संजय काळे, एकनाथ कांबळे, व्यंकट सुर्यवंशी,सतिश नायकवाडे, प्रफुल्ल धामनगावकर अंकुश सिंदगिकर, दृपदा गवळी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला.