लेखक गोविंद पानसरे लिखित पुस्तिकेच्या शिवजयंती निमित्ताने वाटप


 लेखक गोविंद पानसरे लिखित पुस्तिकेच्या शिवजयंती निमित्ताने वाटप

शिवजयंती निमित्त सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे मोफत वाटप

निलंगा:- आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंती निमित्त निलंगा शहरात सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने घराघरात शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.

तत्पूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहून वंदन करण्यात आले.

या बाबत माहीती देताना उपक्रमाच्या आयोजनातील एक सदस्य प्रा.रोहित बनसोडे म्हणाले, की, शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळावा व त्यातूनच आजच्या युवा पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने निलंगा शहरात शिवरायांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प येथील सर्वधर्मीय समाजाच्या वतीने आज शिवाजी कोण होता ? या पुस्तिकेचे वाटप करून शिवरायांना कार्यरूपी अभिवादन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तिकेच्या माध्यमातून लेखक गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता ? दर्शविलेले असून यातून विशेषत: सर्वांना सुलभ पध्दतीने शिवाजी कोण होते समजेल व वाचनांची आवड निर्माण होऊन त्यांना इतिहासाची जाणीव करून देता येईल व आजच्या पिढीला जी पिढी माहीती तंत्रज्ञानाच्या या विश्वात आपला इतिहास विसरत चालली आहे त्यांना या पुस्तिकेतून योग्य दिशा व स्वबळ मिळेल. असे बनसोडे यांनी सांगितले.

यानंतर निलंगा शहरातील खालील सर्व मान्यवरांनी पायी फिरून शहरात पुस्तकाचे वाटप केले.यात सर्वश्री अशोकराव पाटील- निलंगेकर,अभयदादा साळुंके,शिवाजीराव माने,लिंबन महाराज रेशमे,पंडितराव धुमाळ,हमीद शेख,शिवाजी रेशमे,विजयकुमार पाटील,विनोद आर्य,विलास सूर्यवंशी,दयानंद चोपणे,अजित माने, सुनील,माने,अविनाशदादा रेशमे,नारायण सोमवंशी,विलास माने,रजनीकांत कांबळे, जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर,मुरलीधर कांबळे,पत्रकार हरिभाऊ सगरे, इस्माईल लदाफ,रोहित बनसोडे, गोविंद अण्णा शिंगाडे,अजित निंबाळकर, महंमदखाँ पठाण,ऑड.कुर्ले, दिलीप पाटील-मदनसुरीकर, ईश्वर पाटील,धम्मानंद काळे,दिगंबर नणंदकर,युवराज जोगी,रामलिंग पटसाळगे,दाजीबा कांबळे,प्रकाश गायकवाड,दत्ता मोहळकर,मुजीब सौदागर,गोविंद सूर्यवंशी, लाला पटेल,सुधाकर पाटील,फारूक देशमुख,सब्दर काद्री,सिराज देशमुख,शाहरुख शेख,दादाराव जाधव,डॉ.रामकृष्ण वडगावकर,डॉ.समीर तळीखेडकर,अमोल सोनकांबळे,अमित नितनवरे, अजित नाईकवाडे,गिरीश पात्रे,वहीद चौधरी,देवदत्त सूर्यवंशी, सुनील नाईकवाडे,प्रा.गजेंद्र तरंगे,सतीश चिक्राळे,अजगर अन्सारी,अंबादास देशपांडे,सर्वश्री ऑड जगदीश सूर्यवंशी,अजित माकने, गोपाळ इंगळे, तिरुपती शिंदे,विकास मुगळे, भरत गायकवाड, विजयकुमार सूर्यवंशी, तुळशीदास, महेश देशमुख, पंकज शेळके,प्रा.हंसराज भोसले,मिलिंद कांबळे, प्रमोद कदम,तुराब बागवान,हसन चाऊस,उल्हास सूर्यवंशी, इफरोज शेख,शेख मुस्तफा,माहेबूब मिस्त्री,रब्बानी सौदागर,सतीश फटे, हुसेन शेख,राहुल बिराजदार,सिद्धेश्वर बिराजदार,जमील शेख,जमील पटेल,माधव नाईकवाडे,अशोक शिरवाटे, मुन्ना सुरवसे,अजिंक्य लोंढे,उमेश सातपुते,राजपाल पाटील,विलास लोभे,रोहन सुरवसे,प्रमोद ढेरे,नवनाथ कुडुंबले, संतोष मोघे अमेर सय्यद,वाहेद खुरेशी इत्यादी सह अनेक सर्वधर्मीय कार्यकर्ते उपस्थित होते.