अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत •लातूर जिल्ह्यात 97 कोटी 49 लाख 67 हजार मदत

 



अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत

•लातूर जिल्ह्यात 97 कोटी 49 लाख 67 हजार मदत

लातूर :- माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना उर्वरित मदतीचे वाटप करण्यासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक सीएलएस-2021/ प्र.क्र. 258/म-3, दिनांक 21 ऑक्टोबर, 2021 अन्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार उर्वरित आवश्यक निधी लेखाशिर्ष 22452452 अंतर्गत रुपये 66 कोटी 58 लाख 22 हजार व लेखाशिर्ष 22452309 अंतर्गत रुपये 30 कोटी 91 लाख 45 हजार याप्रमाणे एकूण रक्कम 97 कोटी 49 लाख 67 हजार इतका निधी संबंधित तहसीलदारांना वितरीत करण्यात आलेला आहे.
लातूर तालुक्यासाठी 15 कोटी 92 लाख 4 हजार , औसा तालुक्यासाठी 17 कोटी 35 लाख 37 हजार, रेणापूर तालुक्यासाठी 9 कोटी 37 लाख 36 हजार, निलंगा तालुक्यासाठी 17 कोटी 74 लाख 24 हजार , शिरुर अनंतपाळ तालुक्यासाठी 3 कोटी 82 लाख 29 हजार , देवणी तालुक्यासाठी 3 कोटी 88 लाख 76 हजार, उदगीर तालुक्यासाठी 8 कोटी 46 लाख 12 हजार, जळकोट तालुक्यासाठी 4 कोटी 35 लाख 55 हजार, अहमदपूर तालुक्यासाठी 6 कोटी 80 लाख 19 हजार , चाकूर तालुक्यासाठी 9 कोटी 77 लाख 75 हजार असे जिल्ह्यात एकूण 97 कोटी 49 लाख 67 हजार इतका निधी संबंधित तहसीलदारांना वितरीत करण्यात आलेला आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे.