95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी गझल मुशायरा रंगणार

 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी गझल मुशायरा रंगणार


उदगीर : 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्त मराठी गझल मुशायरा सत्राचे आयोजन व मराठी गझल मंच निर्माण करण्यात आला आहे. या मुशायर्यात गझलकारांनी सहभाग घ्यावा.त्यासाठी गझल रचनाकारांनी https:\\abmss95.mumu.edu.in या संकेतस्थळावरुन गुगल फॉर्म भरुन दि. 15/03/2022 पर्यंत आपली स्वरचित एक गझल पाठवून देण्याचे आवाहन 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे. 

अटी व शर्ती : 

1. गझल स्वरचित असावी. 

2. गझल 5 मिनिटात सादरीकरण होणारी असावी. 

3. गझल राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा भंग होणार नाही अशी असावी.

4.  गझल मराठी भाषेतूनच असावी. 

5. वेळेत आलेल्या व समितीने निवड केलेल्याच गझल सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. 

6. निवडीचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.

7. कोविड 19 चे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.  


असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थेचे उपाध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषद उदगीर शाखेचे अध्यक्ष  रामचंद्र तिरुके, संस्थेचे सचिव प्रा. मनोहर पटवारी व समिती प्रमुख शिवकुमार डोईजोडे, प्रा.डाॅ. हमीद अश्रफ आणि गझलकट्टा समिती सदस्य मंडळ यांनी केले आहे.