अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतक­यांना तात्काळ मदत करावी : अशोकराव पाटील निलंगेकर

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकयांना तात्काळ मदत करावी : अशोकराव पाटील निलंगेकर


निलंगा : मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या तिन्ही तालुक्यातील शेतकयांचे मोठे नुकसान झाले आहे. या तिन्ही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. या शेतकयांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्यसरकारने हेक्टरी 25 हजार रूपये व केंद्र सरकारने हेक्टरी 50 हजार रूपये रूपयांची तात्काळ मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. 


 महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निलंगा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र व राज्याकडे मदतीसाठी मागणी केल्याचे अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, नदीकाठच्या शेतकयांच्या जमीनीत पुराचे पाणी गेल्यामुळे उभ्या पिकाची नासाडी तर झालीच त्यासोबतच शेतातील मातीही वाहून गेली आहे. नदीकाठच्या शेतकयांनी हाताशी आलेले काढून ठेवलेले सोयाबीनच्या गंजी या पुरात वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी घुसल्याने शेतात उभे असलेल्या सोयाबीनला जागेवर मोड फुटल्याने हे सोयाबीन काढणीयोग्य राहिले नाही. ऊस भाजीपाला, फळबाग, फुलशेती याचेही या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकयांची जनावरे नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेले आहे. या सर्व बाबींची दखल घेवून सरसकट शेतकयांना पंचनामे करीत न बसता राज्यसरकारने हेक्टरी 25 हजार तर केद्राने हेक्टरी 50 हजार रूपयाची मदत करावी अशी मागणी केली. शिवाय विमा कंपनीने लादलेल्या जाचक अटी बाजूला ठेवून महसूल विभागाच्या पंचनाम्यानूसार विमा त्वरित वाटप व्हावा, थकबाकीदार शेतकयांना कर्जमाफी दिली परंतु चालू बाकीदार असलेल्या शेतकयांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या लाभापासून वंचित असलेल्या चालू बाकीदार शेतकयांना या योजनेचा लाभ द्यावा, व शेतीला केंद्रसरकार उद्योगाचा दर्जा दिल्यामुळे शेती मशागती व शेती दुरूस्तीची कामे मनरेगाच्या मार्फत करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 


 या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे नेते अभय सोळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शेकापचे अॅड. नारायण सोमवंशी, शिवसेनेचे लिंबन महाराज रेश्मे, विनोद आर्य, प्रा. दयानंद चोपणे, सुधाकर पाटील, धम्मानंद काळे उपस्थित होते.