कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याबद्दल राज्य सरकारचा निलंग्यात भाजपकडून निषेध

कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याबद्दल राज्य सरकारचा निलंग्यात भाजपकडून निषेध


निलंगा : केंद्र सरकारने शेतक-यांना स्वातंत्र्य देणारे तीन विधेयके संसदेत संमत केली. या विधेयकांमुळे शेतक-यांना आपला माल कोठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे. परंतु महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने कृषि विधेयकाला स्थगिती देऊन शेतक-यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ निलंगा येथे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरून व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्थगिती आदेशाची उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर होळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.


या वेळी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष शाहूराज थेट्टे, माजी सभापती अजित माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ.संतोष वाघमारे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, न. प. उपाध्यक्ष मनोज कोळे, न. प. सभापती शरद पेठकर, नगर सेवक पिंटु पाटील, मंजुळे, विष्णू ढेरे, शपीक भाई, युवा मोर्चा सरचिटणीस तानाजी बिरादार, जिल्हा संयोजक प्रमोद पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रभारी अशोक वाडीकर, सरचिटणीस आशिष पाटील, सो. मि. तालुकाध्यक्ष सुमित इन्नानी, कूमोद लोभे, प्रशांत पाटील, युवराज पवार, तम्मा माडीबोणे,उपाध्यक्ष संजय हलगरकर , रमेश कांबळे, आदी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.