हतरस येथील पीडित महिलेस न्याय द्यावा : महाराष्ट्र संघर्ष अभियानचे निवेदन

हतरस येथील पीडित महिलेस न्याय द्यावा : महाराष्ट्र संघर्ष अभियानचे निवेदन


उदगीर: उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातीच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र संघर्ष अभियान या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.


हतरस येथील एका अनुसूचित जातीच्या महिलेवर चार ते पाच जणांनी अमानुष अत्याचार केला. यात गंभीर जखमी होऊन ही महिला उपचारादरम्यान मृत पावली आहे. या घटनेमुळे अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवावे अशी मागणी महाराष्ट्र संघर्ष अभियानाचे अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यासह सुनील गोडबोले, मनोहर गायकवाड, मारोती तलवाडकर, चंद्रपाल कांबळे, विजय भालेराव यांनी केली आहे.