उदयगिरीत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

उदयगिरीत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी


उदगीर : (दि.२ऑक्टोबर 2020) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी म.ए. एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहर पटवारी यांच्या हस्ते दोन्हीं महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्यकार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एस.होकरणे यांनी प्रस्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेची पुढील काळात होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा मांडली, यावेळी राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी 'मास्क'चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास डॉ.आर.आर.तांबोळी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के म्हणाले की, मात्र आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे म्हणजे जवाबदारी संपली असे नाही तर संपुर्ण समाजाची जवाबदारी घ्यावी. कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एस.होकरणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पुढील काळात होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.तर अध्यक्षीय समारोप प्रा.पटवारी म्हणाले, समाजात जाणीव जागृती निर्माण करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. ए.यु.नागरगोजे यांनी तर आभार प्रा.मकबूल अहमद यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.