*राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व मान्यवरांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट* 

*राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व मान्यवरांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट*


 


उदगीर: महाराष्ट्राचे बांधकाम, पाणीपुरवठा, पर्यावरण, संसदीय कार्य इत्यादी खात्याचे राज्यमंत्री मा.संजयभाऊ बनसोडे हे उदगीर येथील सुप्रसिद्ध अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या प्रा.सिध्देश्वर पटणे सरांच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना मंत्री महोदय म्हणाले कि नोकरीच्या मागे न लागता आत्मविश्वासाने स्वतःच्या बळावर क्लासेस चालू करून स्वतःबरोबर इतर 10-15 लोकांना रोजगार मिळवून देण्याचे काम प्रा.सिध्देश्वर पटणे सरांनी केलेले आहे याचा आदर्श युवकांनी घ्यावा व फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक संकुल आशा माध्यमातून आपले भविष्य उज्वल बनवावे असे सांगून खरोखरच पटणे सरांनी स्वबळावर उभ केलेले हे शैक्षणिक संकुल त्यातून त्यांनी घडवलेले हजारो विद्यार्थी, कमावलेलं नाव आणि वैभव अतिशय कौतुकास्पद आहे अस गौरव उदगार काढून यापुढे पटणे सरांची शैक्षणिक क्षेत्रात आणखीन खूप प्रगती व्हाव्ही, त्यांच्या हातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जावे, उज्वल बनावे आशा अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. बस्वराज पाटील नागराळकर, सुप्रसिद्ध उद्योगपती रमेशआण्णा आंबरखाने, पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजीराव मुळे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मा.कल्याण पाटील, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.जयद्रथ जाधव, प्राचार्य शंकरराव राठोड, रा.कॉ.सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.नवनाथ गायकवाड, रा.कॉचे शहराध्यक्ष समीरभाई शेख, प्रा.श्याम डावळे सर इत्यादी मान्यवरांचा क्लासेसचे मार्गदर्शक प्रा.गुंडप्पा पटणे सर , इच्छापूर्तीचे संचालक तथा पी.टी. ए.चे तालुका अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे सर , पी.टी.ए चे सचिव प्रा.प्रदीप वीरकपाळे सर यांच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.मदन पाटील तर आभार प्रदर्शन इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी केले.