*उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांचे रक्तदान तर 105 जणांची मधूमेह तपासणी*

*उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांचे रक्तदान तर 105 जणांची मधूमेह तपासणी*


 


*उदगीर (प्रतिनिधी)उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्य आयोजीत रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 105 जणांची मधूमेह तपासणी झाली .*


कोरोणा संसर्गचा वाढता प्रादुर्भावाने मुळे रुग्णांची संख्या वाढत आहे रक्ताची मागणी वाढत आहे परंतू रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने गरजू रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले आहे ब्लड बॅंकेने कूलेल्या आवाहानास प्रतिसाद देत ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्त साधून म.गांधी जयंती निमित्य उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दोन आॅक्टोंबर रोजी उदगीर न.प. व्यापारी संकूल समोरिल प्रांगणात कै.नागप्पा अंबरखाने ब्लड बॅंकेच्या सौजन्याने रक्तदान शिबिर तर मधूर हाॅस्पिटलच्याने सहकार्यांने मधूमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .


नगर परिषदेचे मुख्यधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुजन करुन उदघाटन झाले. यावेळी डाॅ.नवटक्के,उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव श्रीनिवास सोनी, कार्यकारणी सदस्य सुनिल हवा, अर्जून जाधव,डाॅ.धनाजी कुमठेकर रवींद्र हसरगुंडे, विक्रम हलकीकर,माधव रोडगे,महेश मठपती, बबण कांबळे,मनोहर लोहारे,गणेश मुंढे,भरत गायकवाड,अॅड महेश मळगे,अॅड उमाकांत बिरादार, हंसराज जाधव ,अशोक हैबतपुरे यांच्या सह सर्व पत्रकार उपस्थित होते. रक्तदान शिबिरास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,नायब तहसिलदार राजाभाऊ खरात,भाजपाचे प्रदेश चिटणिस नागनाथ निडवदे, कै.नागप्पा अंबरखाने ब्लड बॅकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलिप मजगे,भाजपाचे शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, साईनाथ चिमेगावे,अॅड रमाकांत चटनाळे नगरसेवक गणेश गायकवाड,नागेश अष्टूरे, अहोपाचे सुनिल वट्टमवार याच्या सह मंडळ अधाकारी गुंडरे,मोमीन मुजिब सर,रोटरीचे अध्यक्ष विशाल तोंडचीरकर,ज्ञानेश्वर पारसेवार,धनंजय गूडसुरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या .रक्तदान शिबिर यशस्वी करण्या साठी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.