माझे कुटूंब माझी जबाबदारी योजनेचा शुभारंभ  

माझे कुटूंब माझी जबाबदारी योजनेचा शुभारंभ



डोंगरशेळकी: डोंगरशेळकी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या आरोग्य मोहीमेचा शुभारंभ पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक सचिन पाटील,ग्रामसेवक श्रीमती आलेवार ,ए एन एम वाडकर सिस्टर,गटप्रवर्तक श्रीमती जगतात ,वी वि का से संस्थेचे संचालक अजय कुलकर्णी,नरसन मरेवाड,प्रभाकर अंकुशे,आशा वर्कर मीरा सुवर्णकार,आशा वर्कर महादा कांबळे उपस्थित होते.


 


यावेळी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी बोलताना कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही आरोग्य मोहीम राज्य सरकारने राबवण्याच्या  सूचना दिल्या. ही आरोग्य मोहीम महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांना दैनंदिन आवश्यक बदल करून निरोगी जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. तसेच वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेणेबाबत ही आरोग्य मोहीम मार्गदर्शक ठरणार आहे. असेही मरलापल्ले म्हणाले.


 


 ज्याप्रमाणे महाविकासआघाडी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्याच पद्धतीने आपण तालुक्यात आजपर्यंत सर्वच स्तरांवर आरोग्य सेवा सुविधांचे सक्षमीकरण करत कोरोना विरुद्ध लढा देत आहोत. आपल्या तालुक्यातील, गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य जपण्याची जबाबदारी घेऊन कोरोना रोखण्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत ही मोहीम यशस्वी करण्याचे प्रयत्न सर्वांचे राहतील.अशी अपेक्षा व्यक्त केली.