जिल्हा परिषद सदस्या उषा रोडगे यानी केले जलसाठ्यांचे पूजन

जिल्हा परिषद सदस्या उषा रोडगे यानी केले जलसाठ्यांचे पूजन


--


उदगीर- पूर्ण क्षमतेने भरलेल्या उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील मध्यम प्रकल्पातील जलसाठयाचे पुजन जिल्हा परिषद सदस्या उषा रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.


उदगीर शहरासह देवर्जन, दावणगाव, शेकापुर, भाकसखेडा, गंगापूर आदी गावांना या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय परिसरातील जवळपास दोन हजार हेक्‍टर क्षेत्र या प्रकल्पावर अवलंबून आहे. गेल्या सात वर्षापासून या प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यल्प होता. या वर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागातील शेतकरी व अनेक गावांची तहान भागणार आहे.


या मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यांचे पूजन शुक्रवारी (दि.२५) रोजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रोडगे यांच्या हस्ते झाले. जलसाठ्यांची विधिवत पूजा करून श्रीफळ फोडून पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले. यावेळी 


भाजपा तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, शंकर रोडगे, नारायण मिरगे, गंगाधर गरीबे, पुष्पा कुलकर्णी, अंतेश्वर रोडगे, नारायण पाटील, रामस्वामी कुसळकर, गोपाळ येलमटे, रमेश साकोळकर, शिवराज धोतरे, तेजेराव खटके, कंस बुद्रुक्ष आदी उपस्थित होते.


या मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठी झाडे उगवली आहेत. याची मुळे पाळू मध्ये गेले असल्याने या झाडांमुळे प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे. सातत्याने या विभागाकडे पाठपुरावा करूनही हि झाडे काढण्यात येत नसल्याने या धोक्‍यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या पूर्णक्षमतेने तलाव भरला असल्याने पाण्याचा दाब पाळुवर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या दाबामुळे तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाल्याने परिसरातील गावातील नागरिक भयभीत झाल्याची स्थिती आहे. यावेळी पाहणी करून संबंधित विभागाला हि झाडे तात्काळ काढण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे श्रीमती रोडगे यांनी सांगितले.