जिल्हयातील पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घेण्याचे आवाहन 

जिल्हयातील पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घेण्याचे आवाहन


 


लातूर :- लम्पी स्कीन रोग हा विषाणुजन्य आजार असुन यांचा प्रसार बाहयकिटक व बाधित जनावरांना चांगल्या जनावरांशी संपर्क आल्यामुळे संसर्ग होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी बाधीत जनावरे इतर पशुधनापासून वेगळे ठेवावीत.


जिल्हयात लम्पी स्कनी रोगाचा प्रथम प्रार्दुभाव अहमदपूर तालुक्यात दिसुन आला व या आजाराचे रुग्ण्‍ जिल्हयामध्ये इतर तालुक्यात ही दिसुन येत आहेत. हा आजार प्रामुख्याने गाय वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे तर म्हैस वर्गामध्ये या रोगाचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात दिसुन येत आहे. या रोगामध्ये अंगावर गाठी येणे, ताप येणे, पायावर व पोळीवर सुज येणे अशी लक्षणे दिसुन येतात.


जिल्हयातील 168 गावामध्ये 800 जनावरे बाधीत झाली होती व सदरील बाधीत जनांवरांवर योग्य ते औषधोपचार नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत करण्यात आलेली आहेत. जिल्हयामध्ये एकूण 47 हजार 800 लसमात्रा उपलब्ध्‍ असुन जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. जिल्हयात एकूण 21 हजार 022 ऐवढे लसीकरण करण्यात आले आहे व बाधीत पशुधन आढळलेल्या गावाच्या 5 कि.मी. क्षेत्रात लसीकरण होत आहे.


तथापी नवीन गावामध्ये या आजारोच तुरळक रुग्ण्‍ आढळून येत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे या बाबत जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, पशुसंवर्धन व दुग्ध्‍ विकास सभापती गोविंद चिलकुरे यांनी लसीकरणाची गती वाढवीण्याच्या सुचना दिल्या नुसार जिल्हयातील सर्व बाधित गावामध्ये लसीकरण करणे बाबत अति मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी पशुसंवर्धन विभागास सुचना दिल्या आहेत.


त्यानुसार रोगाचा प्रार्दुभाव पाहता आणखी 50 हजार लस उपलब्ध्‍ करुन देण्यासत येणार आहे. जिल्हयातील सर्व गावामध्ये लसीकरण करण्यात येणार असल्याचे आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडीले यांनी केले आहे.तसेच या रोगामध्ये कुठल्याही प्रकारची मरतुक होत नसल्याने पशुपालकांनी घाबरुन न जाता आपली आजारी जनावरे नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थे मध्ये घेऊन जावून औषधोपचार करुन घ्यावेत असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


 


****