*उदगीरच्या मल्लिकार्जुन चिल्लरगे यांनी केले प्लाझ्मा दान: अत्यवस्थ रुग्णांना मिळणार जीवदान*

*उदगीरच्या मल्लिकार्जुन चिल्लरगे यांनी केले प्लाझ्मा दान: अत्यवस्थ रुग्णांना मिळणार जीवदान*


उदगीर : कोरोनाच्या आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे असे शासकीय पातळीवर वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिष्ठित व्यापारी मल्लिकार्जुन चिल्लरगे यांनी प्लाझ्मा दान करून एका अत्यवस्थ व्यक्तीला जीवदान दिले आहे.


लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याच प्रमाणात बरे होण्याचेही प्रमाण मोठे आहे. कोरोणा आजारातून नीट झालेल्या व्यक्तीचे प्लाझ्मा इतर अत्यवस्थ व्यक्तीसाठी जीवनदान देणारे असून हे प्लाझ्मा दान करावे यासाठी शासनाने आवाहन केले आहे. उदगीर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असलेले संघर्ष मित्र मंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असणारे मल्लिकार्जुन चिल्लरगे यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामजिक भान जपत आपले प्लाझ्मा दान केले.या प्लाझमा मुळे कोरोना पॉझिटिव्ह अत्यावस्थ रूग्णांना जिवदान मिळणार आहे. चिल्लरगे यांनी प्लाझ्मा दान केल्याबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रक्तपेढी विभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. उदगीर येथे रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल , संघर्ष मित्र मंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाच्या वतीनेही मल्लिकार्जुन चिल्लरगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत मांगुळकर, विशाल जैन, रामदास जळकोटे, नारायण वाकुडे,संदीप मजगे,महादेव गठोडे, दत्ताजी केंद्रे, सोमनाथ चील्लरगे यांची उपस्थिती होती.


---------------------------------------------------


शासनाच्या प्लाझ्मा दान करण्याच्या आवाहनाला यापूर्वी सर्वप्रथम जिल्ह्यातून उदगिरच्याच कोरोनामुक्त व्यक्तीने सर्वप्रथम प्रतिसाद देऊन प्लाझ्मा दान केले होते. आता प्लाझ्मा दान करणारे चिल्लरगे हे दुसरे व्यक्तीही उदगीरचेच आहेत.


--------------------------------------------------------


*प्लाझ्मा दान करा: चिल्लरगे*


दरम्यान कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींनी न भिता प्लाझ्मा दान करावे असे आवाहन मल्लिकार्जुन चिल्लरगे यांनी केले असून प्लाझ्मा दान करताना कसलाही त्रास नाही किंवा शरीराला काही अपाय होत नाही तेव्हा न संकोचता सर्वांनी प्लाझ्मा दान करून मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांना जीवदान देऊन पुण्यकर्म करावे असे आवाहन ही चिल्लरगे यांनी केले आहे.*