राममंदिर भूमीपूजनानिमित्त उदगीरात जल्लोष: विविध मंदिरात आरती व पूजा


उदगीर : आज बुधवारी आयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. रामभक्तांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होत असल्याने उदगीर शहरातील रातभक्तांनी विविध मंदिरात आरती, पूजा करून फटाके फोडून जल्लोष साजरा केला.


अयोध्या नगरीत श्रीरामाचे मंदिर व्हावे ही रामभक्तांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही जागा राममंदिराचीच असल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी देशभरात आंदोलने करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर रामभक्तांमध्ये उत्साह संचारला. या पार्श्वभूमीवर उदगीर शहरातील हनुमान कट्टा येथील हनुमान मंदिरात नगरसेवक मनोज पुदाले यांच्या पुढाकारातून आरती व लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, उदयसिंह ठाकूर, बाळासाहेब पाटोदे, अमोल अनकल्ले, माधव टेपाले, मनोज धावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. राममंदिर येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उत्तरा कलबुर्गे, उषा माने, मधुमती कनशेट्टे, अनिता नेमताबादे, मीनाक्षी स्वामी यांची उपस्थिती होती.