मिस्त्री काम करताना दिड महिन्यापूर्वी मोडलेल्या हाताच्या हाडावर लाईफ केअरमधे मोफत शस्त्रक्रिया

मिस्त्री काम करताना दिड महिन्यापूर्वी मोडलेल्या हाताच्या हाडावर लाईफ केअरमधे मोफत शस्त्रक्रिया


उदगीर : 


दीड महिन्यापूर्वी बांधकामावर गिलावा काम करताना तोल जावुन अचानक पडलेल्या मजुरावर लाईफ केअर मधे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली . 


हंचनाळ  ता. देवनी  येथील एका मजुराचे  दिड महिन्यापूर्वी पडल्याने हाताचे दोन्ही हाड  मोडले होते. प्रवाशी वहातूक बंद असल्यामूळे तात्पुरते उपचार करण्यात आले . हाताचे  हाड मोडले होते, शस्त्रक्रियही करण्यात आली नाही, यामुळे ते हाड वाकड्या अवस्थेतच वाढले . 


हाताला खुपच त्रास  होत असल्याने काम करने शक्य नव्हते. काम बंद झाल्यामुळे कुटुंबीयांची आर्थिक आवक  बंद झाली.या मजुरावर खर्चिक असणारी शस्त्रक्रिया लाईफ केअर हॉस्पिटल येथे महात्मा फुले आरोग्य योजने  मोफत करण्यात आल्याने कुटुंबीयानी लाईफ केअर चे चेअरमन माजी आ सुधाकर भालेराव  यांचे आभार मानले. 


 लाईफ केअर हॉस्पिटल येथील अस्थि रोग तज्ञ  डॉ पवन राजूरकर  यानी 'ओपन रिडक्शन इंटर्नल फिक्सेशन विथ बोन ग्राफ्टींग 'अर्थात वाकड्या अवस्थेत जोड्ले जात असलेले  हाड  ग्राफ्टिंग करुन समान्य रुपात जोडण्याची अवघडअशी सुप्रा मेजर शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली. 


-----------------------


लाईफ केअर येथे सर्व शस्त्रक्रिया करण्यात येत असुन लॉक डावून काळात ही रुग्नावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत यासाठी गरजू रुग्नानी लाईफ केअर हॉस्पिटलला सम्पर्क साधावा असे आवाहन लाईफ केअर प्रशासना  मार्फत करण्यात आले आहे.