शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत 

शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत 
उदगीर --शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची मान्यता घेऊन दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स घेतली. या कॉन्फरन्समध्ये देशविदेशातील 365 प्राध्यापक सहभागी झाले होते. 75 प्राध्यापकांच्या शोध निबंधाची निवड यामध्ये करण्यात आली होती.दोन दिवस ऑनलाईन पद्धतीने ही कॉन्फरन्स घेण्यात आली. नाव नोंदणी द्वारे जमा झालेल्या रकमेतून या कॉन्फरन्सचा खर्च करण्यात आला.त्यातून पन्नास हजार रक्कम शिल्लक राहिली होती. सद्यस्थितीमध्ये covid-19 चा परिणाम पूर्ण देशभर आहे.शासनाच्या समोर अनेक समस्या आहेत.शासन स्तरावर अनेकांना आर्थिक मदत केली जात आहे. आपलाही हातभार या परिस्थितीत सर्वसामान्यांना लागावा हा उद्देश लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत शिवाजी महाविद्यालयाने इंग्रजी विभागाच्या कॉन्फरन्सच्या खर्चातील शिल्लक 50 हजार रुपये रक्कम नुकतीच जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.ही रक्कम संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजयकुमार पाटील शिरोळकर, सचिव मा.ज्ञानदेव झोडगे,प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अरविंद नवले यांच्या हस्ते जिल्हाधिकार्‍यांकडे चेकद्वारे देण्यात आली. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी याचे कौतुक केले.