मानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■

मानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■
    सर्वत्र कोरोनाचे संकट आहे.ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आफवा पसरत आहेत. शेतकरी,कष्टकरी व सर्व लोक भयभीत आहेत. आशावेळी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी " वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था कळंब"या संस्थेच्या वतीने  आर्सेनिक आल्बम-30 या गोळयांचे 350 कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीना तीन महिन्यासाठी लागणा-या औषधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वसुंधरा बहुउदेशिय सामाजिक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अनिगुंटे व्यंकट सुग्राम यांनी मार्गदर्शन केले. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन  करावे. या आजाराची लक्षणे व उपाय काय आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगात आपण सर्वजण एक होऊण सामना करावे असे सांगितले.                 या कार्यक्रमात गावच्या सरपंच सौ.मोरे,श्री संदीप मोरे,सयाजीराव पाटील, गोविंदराव मोरे , विठ्ठल डीगे, चंद्रभान गायकवाड गुरुजी,भास्कर आनिगुंटे, कमलाकर पवार,संस्था सदस्य दत्ता गायकवाड,चंद्रकांत शेवाळे,गावतलाठी सावंत साहेब, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ गरगटे,युवराज सुर्यवंशी गावातील पवार,शिंगरूपे, मोरे,बसुदे ,जाधव  या सर्वांची उपस्थिती व सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन श्री संदिप मोरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.