मातृभूमीत वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा!

मातृभूमीत वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा!


 


 उदगीर : येथील मातृभूमी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .मातृभूमी प्रतिष्ठान संचलित मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून उदगीर शहर व परिसरात वृक्षारोपण केले जाते यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्यामुळे विधार्धी नसतांनाही वृक्षारोपण करत मागील अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे .


 दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा निर्माण व्हावेत यासाठी मातृभूमी महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण मुल्य रुजावे यासाठी मागील अनेक वर्षापासून वृक्षारोपण केले केला जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्यापार्श्वभूमीवर महाविद्यालयातील कर्मचाऱ्याच्या पुढाकारातून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आली .यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश व प्राचार्य उषा कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.


 यावेळी गणेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा बिभीषण मद्देवाड प्रा. किशोर हरणे प्रा रणजीत मोरे प्रा उस्ताद सय्यद प्रा स्वाती खोंडे यांची उपस्थिती होती.