लातूर 211 पैकी 171 निगेटिव्ह 29 पॉझिटिव्ह 09 Inconclusive 02 रद्द.

लातूर 211 पैकी 171 निगेटिव्ह 29 पॉझिटिव्ह 09 Inconclusive 02 रद्द.


 


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 41 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून एका व्यक्तीच्या स्वब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.


 


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती बनशेळकी रोड, भीम नगर, सुळ गल्ली, शिवनगर, साई नगर, झीगणप्पा गल्ली, क्वाईल नगर,लातूर येथील व्यक्तीचा समावेश आहे. एक व्यक्ती गंगापूर येथील आहे तर दुसरी व्यक्ती मिरकल ता. बस्वकल्याण जि. बिदर येथील आहे.


 


महानगरपालिकेकडून 06 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 06 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 


स्त्री रुग्णालय लातूर येथून 26 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती अंबाजोगाई रोड लातुर येथील आहे.


 


उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 36 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


 


आज दिनांक 27.06.2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सात रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असल्यामुळे या रुग्णालयातून सुटी करण्यात आली. त्यापैकी तीन रुग्ण शहरातील असून चा रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तसेच यापैकी दोन रुग्णास मधुमेह हा आजार होता एका रुग्णास उच्च रक्तदाब हा आजार होता एका रुग्णाचे हृदयाचे ऑपरेशन झाले होते. त्यातील पाच रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार होता व हे पाच रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये दाखल होते. उर्वरित दोन रुग्णांना सौम्य स्वरूपाचा आजार होता हे रुग्ण 25 ते 80 वर्ष वयोगटातील असून त्यामध्ये चार पुरुष रुग्ण व तीन महिला रुग्ण यांचा समावेश आहे माहिती डॉ. किरण डावळे यांनी दिली.