कोरोणाची साखळी तोडा आरोग्याची अशी साखळी जोडा उदगीर येथील डॉ. गुजलवार परिवार यांनी कोरोनावरील सवांद नाटीकेतून दिला प्रबोधनाचा नारा.... 

कोरोणाची साखळी तोडा आरोग्याची अशी साखळी जोडा


उदगीर येथील डॉ. गुजलवार परिवार यांनी कोरोनावरील सवांद नाटीकेतून दिला प्रबोधनाचा नारा.... 


उदगीर : डॉ. उदय गुजलवार हे उदगीर येथील कृष्णकांत चौक दंडवते कॉपलेक्स येथे कार्यरत असून त्यांनी कोरोना महामारिवर अतिशय उत्तम नाटिका ग्रामीण व शहरी जनतेसाठी सादर केली आहे. ह्या नाटीकेत कलावंत उदय गुजलवार (वडील),सुरेखा गुजलवार (आई) (पथालॉजी) , व अपत्य ची.ऋषिकेश(गण्या) आयुष (गप्या) गुजलवार या चिमुकल्यांनी ही या भूमिकेतून सहभाग घेतला 'कोरोनाची साखळी तोडा व आरोग्याची साखळी अशी जोडा ह्या संदेशाचे 'हे नाटीकेतून जनजागृतीचे काम त्यांनी केले आहे . .ग्रामीण बोली भाषेतून कोरोना महामारिवर घ्यावयाची काळजी व भारत देशाच्या सरकारचि जनतेस असलेली मदत .... ह्याची माहिती यात दिली असून , गरिबांच्या जीवनात धुमाकूळ घालत असलेल्या ह्या कोरोनाचे संकट त्यातून हाल बेहाल होणाऱ्या गरिबाच्या जीवनाचे चित्र दाखवून गरिबांना सरकारची मदतीची धोरणे अतिशय खुबीने सवांदित केल्या आहेत. 


गरिबांची होणारी उपासमार ,सांगून कोरोणा महामारीवर लढण्याची ताकद देवून सामान्य व सर्व जनतेस शासणाप्रती विश्वास सुविधांचा आधार ...सांगितला आहे. कोरोणा हा जात पात धर्म लिंग वय गरीब श्रीमंत कोणताही भेद न करता कोणालाही होऊ शकतो असे ग्रामीण बोलीतून हा संदेश मर्मदायी आहे. तळागाळातील सर्व ग्रामीण व शहरी लोकांना ह्या नाटीकेने विश्वासाचा धीराचा संदेश देऊन मोलाची कामगिरी केली आहे . 


या नाटीकेतील सवांदलेखन व निवेदन सुरेखा गुजलवार यांनी केले .हे सवांद ग्रामीण व हृदयस्पर्शी असून प्रबोधनाचे अत्युत्कृष्ट अशी कामगिरी ह्या नाटीकेतुन होत आहे आहे . 


यू ट्यूब वर सुद्धा ह्या नाटीकेचे प्रक्षेपण असून . गुजलवार परिवाराने असे आणखी काही सवादातमक ना टीकेतूनही उदगीरकराना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोणच्या लढाईत जनतेने सबळ खंबीर होऊन लढण्याचा संदेश दिला. व गंभीरतेने ,विश्वासाने ,आणि सजगतेने एकमेकास हात देऊन प्रशासनास मदतीचे आवाहन केले आहे .या नाटीकेतून नक्कीच जनतेला कोरोणची साखळी तोडण्यास व आरोग्याची साखळी जोडण्यास मदत होईल . 


उदगीरकराना गाभिर्याने व धीराने लढा देण्यासाठी ह्या नाटीकेचे प्रबोधन नक्कीच सर्वोपायोगी होईल . डॉ. गुजलवार उदय व सुरेखा गुजलवार व चिमुकल्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. . .