तरुणाच्या पुढाकारातुन पोलीस प्रशासनाची मोफत आरोग्य तपासणी स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त उपक्रम : हॅण्ड सॅनिटायझर व साहित्य वाटप

तरुणाच्या पुढाकारातुन पोलीस प्रशासनाची मोफत आरोग्य तपासणी स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त उपक्रम : हॅण्ड सॅनिटायझर व साहित्य वाटप


उदगीर : येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता विपीन जाधव याने सोमवारी स्व विलासराव देशमुख यांच्या 75व्या जयंती निमित्त पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेऊन आदरांजली वाहिली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर , उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा , एस.आर.पी.एफ सोलापूर दलाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना विषाणूजन्य आजारा आपत्ती मध्ये पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्याचे आभार व त्यांच्याप्रती कर्तव्य म्हणुन स्व विलासराव देशमुख जयंती निमित्त आरोग्य शिबिरीचे आयोजन केले होते. या शिबिरात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर थर्मल स्क्रिनिंग, मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच पोलिस विभागास हॅण्ड सॅनिटायझर, ट्रिपल लेअर मास्क,५% सोडियम हायपोक्लोराइट देण्यात आले. या शिबिरास डॉ. रमण येनालडे, डॉ प्रशांत नवटक्के व एस.एम. ऐसलवाड यांनी सहकार्य केले.