शेतकऱ्यांसदर्भात विविध मागण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन लॉकडाऊनच्या काळात अडचण निर्माण होऊ नये: शरद पवार विचार मंचची मागणी

शेतकऱ्यांसदर्भात विविध मागण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
लॉकडाऊनच्या काळात अडचण निर्माण होऊ नये: शरद पवार विचार मंचची मागणी
निलंगा : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकरी व सामान्य माणसाला कसलीही अडचण निर्माण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करीत निलंगा येथील शरद पवार विचार मंच च्या वतीने शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंगा यांना दिले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात येणाऱ्या खरिप हंगामात शेतकऱ्याला सोयाबीन तुर मुग उडीद ज्वारी पिकांचे अनुदानित बियाणे मिळावे, सोयाबीन बियाणे व रासायनिक खते मोठ्या प्रमाणात चढ्या भावाने विक्री होण्याची शक्यता आहे यासाठी शासनाने नियंत्रण ठेवावे, जैविक व रासायनिक बुरशीनाशकांचा पुरवठा अनुदानित पध्दतीने मिळावा, अधिग्रहण करणे बाबत, मागील खरिप हंगामात अकाली पावसाने व अतिवृष्टी मुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्या कडे उपलब्ध असलेले बियाणे पेरणीयोग्य नाही यासाठी शासनाने शेतकऱ्याला सोयाबीन बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे, बाजारात मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्याकडून कमी प्रतीचे सोयाबीन बियाणे विक्री होण्याची शक्यता आहे व चढ्या भावाने सुध्दा विक्री होवून शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते यासाठी शासनाने दक्षता पथक स्थापन करावे, रासायनिक खते पुरवठा शेतकऱ्याचा बांधावर होणार आहे असे शासनाने जाहीर केले असले तरिही शेतकरी बाजारात उपलब्ध खते खरेदी करण्यासाठी जातात व चढ्या भावाने खरेदी करण्याची शक्यता आहे तसेच बर्‍याच वेळेला याचा फायदा कांही नफेखोरी करणारे विक्रेते/पुरवठादार बोगस खते विकण्याची शक्यता आहे यासाठी शेतकऱ्याने बि-बियाणे,खते खरेदी ची पक्की पावती घ्यावी यासाठी कृषीविभागाकडून जनजागृती व्हावी,
कोरोणा विषाणूचे संक्रमण होवू नये यासाठी शासनाने घराबाहेर पडू नये असे आदेश दिले आहेत अश्या परिस्थितीत निलंगा शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, सास्तूर माकणी येथील तेरणा प्रकल्पात पाणी साठा मुबलक प्रमाणात असूनही निलंगा शहरात कांही दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, यासाठी निलंगा नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी, निलंगा तालुक्यात बर्‍याच गावांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यासाठी उपाययोजना म्हणून तात्पुरता स्वरूपात गावात/गावालगत परिसरातील चालू असलेले विहीर/बोअरवेल अधिग्रहण करून किंवा पाण्याच्या टँकरमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्याला चांगले प्रतीचे खते,बुरशी नाशके, सोयाबीन बियाणे अनुदान स्वरूपात मिळवून द्यावे व तसेच बाजारात बोगस खते बियाणे विक्री होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि निलंगा शहरातील व तालुक्यातील विविध भागात पाणी टंचाई जाणवत आहे त्याठिकाणी टँकर मार्फत/विहीर बोअरवेल अधिग्रहण करून संबंधित विभागाकडून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर शरद पवार विचार मंचचे तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे, तालुका उपाध्यक्ष अंगद जाधव, शहराध्यक्ष
धम्मानंद काळे, राष्ट्रवादी चे सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस किरण सोळुंके
गफ्फार लालटेकडे, संदिप मोरे , राम पाटील , सुरेश रोळे, राजकुमार माने, लक्ष्मण क्षीरसागर, पंढरी पाटील, विकास ढेरे, मोरे, बालाजी शिंदे, दयानंद मोरे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.