जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7 हजार 268 व्यक्तींची तपासणी * आजच्या 26 स्वाबपैकी 25 स्वाबचे अहवाल निगेटिव्ह तर उस्मानाबाद येथील 9 पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह * उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 4 व्यक्तींच्या स्वाबचे अहवाल निगेटिव्ह

*जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7 हजार 268 व्यक्तींची तपासणी


* आजच्या 26 स्वाबपैकी 25 स्वाबचे अहवाल निगेटिव्ह तर उस्मानाबाद येथील 9 पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
* उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 4 व्यक्तींच्या स्वाबचे अहवाल निगेटिव्ह
लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 11.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 42 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 7268 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 259 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 250 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे व एका रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे. आजपर्यंत 220 व्यक्तींचा Home Quarantine कालावधी समाप्त झाला असुन एकुण 39 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 26 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 4 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 1, बीड 12, उस्मानाबाद 9, व असे एकुण 26 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन उस्मानाबाद येथील एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.