उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 6 व्यक्तीच्या स्वॅब पैकी 5 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह; तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 6 व्यक्तीच्या स्वॅब पैकी 5 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह; तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह 
लातूर, :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 7, चाकुर 1, निलंगा 2, बीड 14, उस्मानाबाद 17 असे एकुण 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 46 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन उदगीर येथील एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.