• उदगीरात शिवभोजन थाळीचे उद्घाटन • उदगीर


उदगीरात शिवभोजन थाळीचे उद्घाटन
उदगीर 
• कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गरीब व गरजू नागरीक अन्ना वाचून उपाशी राहू नये म्हणून तालुका स्तरावर पाच रुपयात शिवभोजन थाळीची सुरुवात करण्याच्या सुचनेवरुन उदगीर येथे अजिंठा हॉटेल मध्ये तात्काळ अमलबजावणी करत शिवभोजन थाळीची सुरूवात करण्यात आली.
• उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल मुचेवाड, रणजित कांबळे, अजिंठा हॉटेलचे मालक सुभाष नागठाणे यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
• कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात २३ मार्च पासून संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आले. या दरम्यान ज्यांचे हातावर पोट आहेत त्याचबरोबर रस्त्याने फिरणारे कुटुंब नसलेले नागरीक यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ तालुका स्तरावर पाच रुपयात शिवभोजन थाळीची सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. त्याचे पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री  संजय बनसोडे     यांच्या मार्गदर्शनाखाली  अंमलबजावणी करत तालुका स्तरावर कमीटी नेमुणक शुक्रवारी शिवाजी चौकातील अजिंठा हॉटेल या ठिकाणी शिवभोजन केंद्राची सुरुवात करण्यात आली. याठिकाणी दररोज सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच रुपयात शिवभोजन थाळी मिळणार आहेत.