• *अव्होपाच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप* • *गरजू लाभार्थ्यांना थेट घरपोच मदत*

*अव्होपाच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप*
*गरजू लाभार्थ्यांना थेट घरपोच मदत*
उदगीर : सातत्याने सामाजिक बांधीलकी जोपासत काम करणाऱ्या आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन (अव्होपा) व बाल गणेश मंडळ मलगे गल्ली या संघटनांनी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांना अन्नधान्याचे किट थेट घरपोच देऊन संवेदनशीलता जपली आहे. हा मदतीचा हात पुढे करताना या संघटनांनी जात-पात न पाहता खऱ्या गरजू लोकांना मदत पोहोचविली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने लॉक डाऊन लागू केल्यामुळे दैनंदिन रोजगार करून पोट भरणाऱ्या मजूर, गोरगरिबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. नेहमीच आपली संवेदनशीलता जपणाऱ्या अव्होपा व बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी याही ठिकाणी संवेदनशीलतेचे दर्शन दिले. खऱ्या गरजू लोकांना मदत मिळावी यासाठी दोन्ही संघटनेतील पदाधिकाऱ्यानी एक टीम तयार करून गरजु लोकांचे सर्वेक्षण केले. त्यात ११५ लोकांची यादी करून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून अव्होपाच्या अन्नपूर्णा योजनेतून जीवनावश्यक वस्तूची मदत देण्यात आली. गहू, तांदूळ, तूरडाळ, गोडेतेल, साखर, चहापत्ती, दोन्ही प्रकारचे साबण, मिरची पावडर, हळद आदी जीवनावश्यक वस्तूचे किट तयार करून ११५ लोकांना घरपोच देण्यात आले.
दरम्यान ज्ञानेश्वर मंदिर येथे १० जणांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याधिकारी भारत राठोड, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक रामचंद्र मुक्कावार यांच्या हस्ते देण्यात आले. उर्वरीत जणांना थेट घरपोच करण्यात आले. यावेळी पत्रकार राम मोटीपवळे, विक्रम हलकीकर, श्याम वट्टमवार , प्रवीण चंडेगावे उपस्थित होते.
या कार्यासाठी अव्होपाची ७ जणांची टीम ज्ञानेश्वर पारसेवार,अनिरुद्ध मुक्कावार, संजय चन्नावार, संजय संगूळगे,अनिल मारमवार, विजय गबाळे,देविदास पारसेवार यांच्या समितीने काम केले. या उपक्रमासाठी अव्होपा चे अध्यक्ष डॉ.दीपक चिद्दरवार,सचिव प्रा. सुनील वट्टमवार,कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार, बाल गणेश मंडळाचे विजय पारसेवार, संजय दीक्षित , कैलाश पारसेवार, पिंटू हुडगे, जय स्वामी ,रवी सुगधी ,रवी चुडमुडे यांनी पुढाकार घेतला.