उदगीर बाजार समिती बुधवार पासून सुरू- सिध्देश्वर पाटील

उदगीर बाजार समिती बुधवार पासून सुरू- सिध्देश्वर पाटील
उदगीर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत असोसिएशनचे व्यापारी व खरेदीदार यांची सोमवारी संयुक्त बैठक होऊन त्यात बुधवारपासून बाजार समितीमधील सर्व व्यवहार कोरोना आजाराबाबतचे सर्व निकष व नियम पाळून चालू करण्याबाबत एकमत झाले व त्यानुसार उद्या बुधवार दि. १५ एप्रिल पासुन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे व्यवहार चालू करण्यात येणार आहेत अशी माहीती बाजार समीतीचे सभापती सिध्देश्वर पाटील यांनी दिली. 
कोरोना रोगाच्या पाश्वभुमीवर शासनाने लाॅकडाऊनची घोषणा केली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेली उदगीर कृषी उत्पन्न बाजार समीती अंतर्गत चालणारा आडत बाजार बुधवारी पासून सुरू होणार आहे. यावेळी कोरोना कोव्हीड-१९ संबंधीचे सर्व निकष व नियम पाळुन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार होणार असल्याची माहिती सभापती पाटील यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील व सिमा भागातील मोठी असलेल्या या बाजारात शेतमालाचे व्यवहार सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांची फार मोठी सोय होणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले. जिल्ह्यामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पणन संचालकांनी सोशल डिसडन्स पाळून बाजार समित्या सुरू करण्याच्या सुचना असल्याचे जिल्हा उपनिबंधक जाधव यांनी सांगीतल्याने उदगीरचे बाजार सुरू होत असल्याचे पाटील यांनी सांगीतले . 
–---------------------
दररोज सकाळी १० वाजता व्यवहार सुरू होऊन दुपारी ३ वाजता व्यवहार संपतील. एका दिवशी एकाच शेतमालाचा सौदा होणार आहे. बुधवारी तुरी, गुरूवारी चना, शुक्रवारी सोयाबीन याप्रमाणे शेतीमालाची खरेदी- विक्री केली जाईल. ज्या दिवशी ज्या शेतमालाचा सौदा होणार आहे तोच शेतीमाल शेतकऱ्यांनी बाजारात आणावा असे आडत असोशिएशनचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी सांगीतले.
----------------------
येथील अडत व खरेदीदार व्यापाऱ्यांनी बाजारातील संभाव्य गर्दी टाळण्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरावे. सोशल डिस्टनचे तंतोतंत पालन करावे. एका वाहना 
सोबत एकच शेतकरी बाजारात यावे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण कायदा लागू असल्याने शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे तंतोतंत पालन केले पाहिजे. अडते, खरेदीदार, हमाल व गुमास्ता यांनी मास्क घालने बंधनकारक आहे. यात नियमाचा भंग झाल्यास सर्वस्वी जबाबदार व्यापारी राहतील. त्यास बाजार समिती जबाबदार राहणार नाही असे सभापती पाटील यांनी यावेळी सांगितले.