उदयगिरी' ने ऑनलाईन लर्निंग अध्यापनाचा घडविला इतिहास

'उदयगिरी' ने ऑनलाईन लर्निंग अध्यापनाचा घडविला इतिहास
 उदगीर :कोरोनाने सर्वांची करूण  अवस्था केली आहे. संपूर्ण विश्वात मृत्यूचे तांडव सुरू आहे. भारतात लॉकडाऊन आहे. विद्यालयापासून विद्यापीठापर्यंत अध्ययन - अध्यापनाची प्रक्रिया बंद असून विद्यार्थी आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत अकरावी विज्ञान जिनीयस तुकडीसाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ऑनलाईन अध्यापन सुरू केले आहे. सदरील सुविधेचा लाभ विद्यार्थी घरी बसूनच घेत आहेत. मोबाईलद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातात. याबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. म. ए. सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी व संस्थाचालकांच्या सूचनेनुसार महाविद्यालयाने लॉकडाऊनच्या काळातही अध्यापनाची सुविधा उपलब्ध करून शिक्षणात अध्यापनाचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाबद्दल अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे,प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के(व.म.), उपप्राचार्य प्रा.आर.एन. जाधव (क.म.) पर्यवेक्षक प्रा. बी. एन. गायकवाड यांचे आभार मानले आहेत.