वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांनी केली होळी साजरी उदगीर : येथील किडझी स्कूलच्या चिमुकल्यानी सोमवारी वृक्ष लागवड करून लाकुड जाळून नव्हे तर वृक्ष लागवड करून होळी साजरी करण्याचा संदेश दिला. देगलूर रोड वरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे प्राचार्य श्रीपाद सिमंतकर, ग्रीन आर्मीच्या सदस्या अर्चना नळगीरकर व शोभा कोटलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक मनोज गुरुडे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाचे महत्व विशद केले. सूत्रसंचालन प्राचार्य स्वाती गुरुडे यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या सूर्यवंशी, सविता तलवारे, धनश्री घाटगे, रोहिणी मटके, यास्मिन शेख, आफ्रीन सिद्धीकी आदीनि पुढाकार घेतला. –--------------------- चिमुकल्यानी बनविले नैसर्गिक रंग.... किडझी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धुळवड खेळण्यासाठी मका, जिलबिचा रंग आदी साहीत्य वापरून नैसर्गिक रंग तयार केले. कोरोना पासून बचाव करणयासाठी आणि रंगाचा आनंद घेण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला.