आजपर्यंत 2 हजार 543 व्यक्तींची तपासणी , तर आज 93 व्यक्तींची तपासणी * 50 व्यक्तींची स्वॅब तपासणी तर 43 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह * 34 व्यक्ती जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Qurantined लातूर, :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 27 मार्च 2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत एकुण 93 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 2 हजार 543 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी रष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 43 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यापैकी पाच व्यक्तीची अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना या संस्थेच्या विलगीकरण कक्षा मध्ये दाखल करण्यात आले आहे व इतर दोन व्यक्तींना खासगी रुग्णालयाच्या वर्गीकरण कक्षा मध्ये दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ व्यक्तींचा Quarantined कालावधी संपला आहे व इतर 34 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा औषधवैद्यकशास्त्र विभाग सहयोगी प्राध्यापक डॉ. मारुती कराळे यांनी दिली. प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.