झोपडीतील लोकांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप ..... मानवतेसाठी एक हात मदतीचा- भटक्या विमुक्त संघटनेचे विलास माने यांचा पुढाकार. निलंगा : - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या व भटक्या विमुक्त समाजाला बसला आहे . या लोकांना मजुरी व पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने भटक्या विमुक्त संघटना व श्रमिक विकास संस्था निलंगा यांच्यावतीने अशा 100 गरजू कुटुंबांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप करण्यात आले . निलंगा येथे हे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची वस्ती आहे . यासोबतच निलंगा येथे वडार, मसणजोगी, कैकाडी ,पारधी, शिकलकरी, घिसाडी यासह भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे.या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे . त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील व पाली वरील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत . त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासत झोपडपट्टीतील गरीब माणसांना मदत करण्यासाठी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते " कत्तीकार " विलास माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रविवार दिनांक 29 मार्च रोजी आपल्या "उपरा " या निवासस्थानी शंभर गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, गोड तेलाचे एक किलो ची एक पाकीट, कपड्याचे व अंगाचे साबण यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ कलावती माने, विकास माने, दशरथ जाधव ,वैजनाथ जाधव ,भाग्यश्री माने, आशाताई जाधव , इंदरकौर टाक आदी उपस्थित होते .