<no title>*डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान शिबीर* निलंगा : येथिल महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर येथील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ विलास भोजने व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ चंद्रकुमार कदम, उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड, कार्यक्रमाधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडूर, डॉ भास्कर गायकवाड, रासेयो स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक अवेज पटेल,नासेर देशमुख, सय्यद शाहरुख, कार्तिक वाघमारे,माने अहिल्या, धुमाळ पल्लवी, उमाजी तोरकड, मनोहर एखंडे इत्यादिंनी परिश्रम घेतले.